मराठी powered by Lipikaar.com
आपल्या मायबोलीतून लिहिता येण्याच समाधान काही औरच आहे.
धंदा आणि पाणी ह्यांच्या पलीकडे जाउन, विचार करणारी मराठी माणसं तशी सहसा शोधून मिळत नाहीत.
आणि त्यातूनही कधी एकत्र आलीच तर विषय हा उगाळून उगाळून शेवटी राजकारणी, त्यांचे चरित्र, त्यांचा निर्लज्जपणा, आणि ह्या सगळ्याला काहीच उपाय कसा नाही, ह्या निष्कर्शावर येउन, एखाद्या हार्ट एटेक आलेल्या रुग्णासारखा, अचानक खलास होतो.
शिवाजी महाराज जरी आपल्या समाजाचे एक ओळख असले, तरी त्यांच्यानंतर, त्यांची परंपरा, हि कशी, कोणीच पुढे चालु ठेवली नाही, आणि त्यामुळे ह्या राजकारण्यांचे कसे फोफावले, हे अगदी ठासून सांगणारा मराठी माणूस हा आपल्या फायद्याचे काय ते लाटून घेताना, त्याच शिवाजी महाराजांना, अगदी सोईस्करपणे विसरलेला असतो.
Saturday, December 18, 2010
Subscribe to:
Posts (Atom)